राळेगणसिद्धी विद्यालयात आपले सहर्ष स्वागत आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने शासनाचा पुढील आदेश येइपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरा व आपला प्रवेश आजच निश्चित करा...

परिपाठ

दैनंदिन परिपाठ...


परिपाठ सादर करताना गीतमंच आणि वाद्यवृंद...
        शालेय परिपाठ हा या विद्यालयाचा एक मानबिंदू आहे. रोज सकाळी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी संपूर्ण शालेय परिसराची सफाई करून घेतात. संपूर्ण परिसर कसा आरशासारखा स्वच्छ केला जातो.


परिपाठात सहभागी झालेले विद्यालयातील सर्व विद्यार्थी...
        त्यानंतर रोज होणारा साग्रसंगीत परिपाठ शाळेतील वातावरण उत्साही आणि मंगलमय करतो. रोजचा परिपाठ असला तरी तो कधीच कंटाळवाणा होत नाही. विद्यार्थी परिपाठाची आतुरतेने वाट पाहत असतात. मंचावर वाद्यवृंद आणि गीतमंचातील मुली आणि समोरच्या प्रांगणात अत्यंत शिस्तीने बसलेले सर्व विद्यार्थी .... रोज वेगळी प्रार्थना... कधी स्फूर्तिगीते, देशभक्तीपर गीते, पर्यावरण गीते एक ताल एक सूर या पद्धतीने आनंदी वातावरणात गायन होते. रोज सामूहिक पद्धतीने वेगळ्या भाषेतील प्रतिज्ञा घेतली जाते. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संसकृत प्रतिज्ञेचा समावेश असतो. सर्व विद्यार्थी सामूहिक संविधान म्हणतात. तसेच पसायदान, गुरुस्तवन आणि काही वेळ ध्यानधारणा.... असे परिपाठाचे स्वरुप असते.

        त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, भाषिक कौशल्ये, प्रबोधनात्मक आणि कलात्मक सादरीकरणाची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येते. वर्षभर चालणाऱ्या या वैविध्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांवर देशभक्ती, स्वच्छता, सौजन्यशीलता, प्रामाणिकपणा असे संस्कार होतातच, त्याचबरोबर त्यांच्यातील विविध कलागुणांनाही वाव मिळतो...