राळेगणसिद्धी विद्यालयात आपले सहर्ष स्वागत आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने शासनाचा पुढील आदेश येइपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरा व आपला प्रवेश आजच निश्चित करा...

वसतिगृह

वसतिगृह....

संस्थेचे 350 विद्यार्थी क्षमतेचे सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह आहे. या वसतिृहात केवळ मुलांनाच प्रवेश देण्यात येतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मुले येथे शिक्षण घेतात. या वसतिृहाला कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. निवास, भोजन आणि विविध प्रकारच्या उपक्रमा्ंसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे प्रयत्न करण्यात येतात...


संत यादवबाबा विद्यार्थी वसतिगृहाची सर्व सुविधांनी युक्त इमारत...

या शाळेत परिसरातील मुलामुलींना इयत्ता 5 वी ते 12 पर्यंत प्रवेश देण्यात येतो. इयत्ता 10 पर्यंत प्रत्येक वर्गाच्या मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या स्वतंत्र तुकड्या आहेत. विद्यार्थ्यांची आवड आणि गुणवत्ता यानुसार विद्यार्थ्यांना मराठी किंवा सेमी इंग्रजी माध्यमाच्या तुकडीत प्रवेश देण्यात येतो. विद्यालयाचे 350 विद्यार्थी क्षमतेचे सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह आहे. या वसतिगृहात गावाबाहेरील विशेषतः इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. वसतिगृह खाजगी स्वरुपाचे असून त्याला कोणतेही शासकीय अनुदान नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाचा वार्षिक खर्च पालक देतात. सदर शुल्क दोन टप्प्यात जमा करण्याची सुविधा असते. वसतिगृहात इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतचे विद्यार्थी राहतात.

वसतिगृहात हुशार विद्यार्थ्यांबरोबरच अभ्यासात मागे पडलेले, वाईट सवयींच्या आहारी गेलेले, वाईट संगतीने वाया गेलेले अशा विद्यार्थ्यांनाही प्राधान्याने प्रवेश देण्यात येतो. अर्थात अशा मुलांना किमान लेखन वाचन आणि मूलभूत गणिती क्रिया अवगत असल्या पाहिजेत. या विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी शाळेत सर्व वर्गांचे वर्षभर जादा तास घेतले जातात. त्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक सकाळी आठ वाजल्यापासूनच शाळेत उपस्थित असतात. रात्री 8 ते 10 या वेळेत रात्र अभ्यासिका घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला जातो. 

शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्लास घेण्यात येतात. भरपूर सराव परीक्षा घेण्यात येतात. त्याचप्रमाणे एनएमएमएस परीक्षा, एमटीएस परीक्षा, एनटीएस परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा, विविध क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमातही विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेण्यात येते.

त्यामुळे विद्यार्थ्यांची सुधारणा होते आणि गुणवत्ता चांगली राहते.