राळेगणसिद्धी विद्यालयात आपले सहर्ष स्वागत आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने शासनाचा पुढील आदेश येइपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरा व आपला प्रवेश आजच निश्चित करा...

डीजिटल

डीजिटल क्लासरूम...

काळाच्या ओघात विज्ञान व तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यात मागे राहू नयेत यासाठी विद्यालयात सातत्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो.

अद्ययावत संगणक प्रयोगशाळा...
2013 मध्ये विद्यालयात 32 अद्ययावत संगणक असलेली अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी बोहेरून कोणत्याही स्वरुपाच्या देणग्या किंवा सरकारचे अनुदान घेतले नाही. ग्रामस्थ आणि पालक वर्गाच्या महत्त्वपूर्ण सहभागातून हे काम करण्यात आले. एवढेच नाही तर 2016 मध्ये 5 वी ते 12 पर्यंतचे सर्व वर्ग डीजिटल करण्यात आले. प्रत्येक वर्गात संगणक, ध्वनी व्यवस्था आणि प्रोजेक्टर बसवण्यात आले. सर्व शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पीपीटी द्वारे आणि इलर्निंग सॉफ्टवेअर द्वारे अदिक प्रभावीपणे शिक्षणाचे काम प्रगतीपथावर जाण्यास मदत झाली. अशा प्रकारे शाळेने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला.

डीजिटल क्लासरूम... इलर्निंग...
आज विद्यालयाचे कार्यालयीन आणि इतर सर्व प्रकारचे कामकाज संगणकिकृत करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी 72 संगणक असलेल्या दोन प्रयोगशाळा आहेत. तेथे इंटरनेट जोडणी आहे. शिक्षकांना त्यांची कामे करण्यासाठी स्वतंत्र 6 संगणक आहेत. तर कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र संगणक व्यवस्था आहे.